Ad will apear here
Next
भारत बनला विजेचा निर्यातदार
नवी दिल्ली : भारत पहिल्यांदाच विजेचा निर्यातदार देश ठरला असल्याची माहिती केंद्रीय वीज प्राधिकरणाने दिली आहे. २०१६-१७ या वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारताने सुमारे ५७९८ दशलक्ष युनिट वीज नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि भूतानला निर्यात केली आहे. गेल्या तीन वर्षांत नेपाळ आणि बांगलादेशला निर्यात होणाऱ्या विजेत लक्षणीय वाढ झाली आहे. 

ऐंशीच्या दशकापासून भारताने सीमेपलीकडे विजेचा व्यापार सुरू केला. भूतानकडून विजेची आयात होत होती, तर नेपाळला अतिशय कमी प्रमाणात वीजनिर्यात होत होती. गेल्या वर्षभरापासून नेपाळला होणाऱ्या वीजनिर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. बांगलादेशालाही सध्या भारतातून सहाशे मेगावॉट वीज निर्यात केली जाते. नेपाळला होणाऱ्या वीजनिर्यातीत लवकरच वाढ होईल, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AYWPBA
Similar Posts
नेपाळशी मैत्रीला कराराचे ‘इंधन’ नवी दिल्ली : भारताने नेपाळला दर वर्षी १३ लाख टन इंधनाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी पुढील पाच वर्षे नेपाळला पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा नैसर्गिक वायू, केरोसीन, हवाई इंधन यांचा पुरवठा करणार आहे.  भौगोलिकदृष्ट्या भारत आणि चीनच्या मध्यभागी असणाऱ्या
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
वाहन खरेदीच्या निर्णयावर डिजिटल माध्यमांचा प्रभाव नवी दिल्ली : भारतातील वाहन खरेदीची संस्कृती वेगाने बदलत असून, सुमारे ९० टक्के ग्राहकांच्या वाहन खरेदीच्या निर्णयावर डिजिटल माध्यमांचा प्रभाव पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगल आणि बाजारपेठेचा अभ्यास करणारी संस्था कँटर टीएनएस यांनी संयुक्तपणे केलेल्या एका अभ्यासात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रपतिपदाची निवडणूक १७ जुलैला नवी दिल्ली : देशाचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला नवे राष्ट्रपती लाभणार असून, त्यासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी मतदान होणार असून, २० जुलैला मतमोजणी होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language